"FTX: एका क्रिप्टो साम्राज्याचा उदय आणि पतन"

 


नमस्कार सर्वांना!

    सप्तरंग जरी तेजस्वी असत, तरी तोच रंग जर धुक्याच्या कुशीत हरवला तर?
एखादी चमकदार समृद्धी काही काळात कमजोर होऊन जाणे . FTX असाच एक प्रवास होता.
आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो: एक क्रिप्टो एक्सचेंज – जे काहीच वेळात $32 अब्ज मूल्यांकनास पोहचले. आणि तो अचानक दिवाळखोरीत कसा गेलं?
FTX एक मजबूत इमारत होती.तेजस्वी आणि उंच पण बियाण्यांसारख्या अस्थिर पायावर उभी. 
चला, सुरू करूया हा प्रवास -जिथे तेज आणि धुळीच्या दोन्ही उदय आणि पतनाचे रहस्य सामोरे येणार आहेत!

लहान व्यवसाय VS स्टार्टअप

    सुरुवात – क्रिप्टोच्या नव्या युगाची आशा.

        २०१९ मध्ये Sam Bankman-Fried (SBF) आणि Gary Wang यांनी FTX नावाचं क्रिप्टो एक्सचेंज सुरु केलं. उद्देश होता .क्रिप्टो ट्रेडिंग अधिक वेगवान, सुरक्षित आणि मोठ्या इन्व्हेस्टर्ससाठी सोयीस्कर करणे. SBF आधी Jane Street Capital मध्ये ट्रेडर होता. Sam याने आधी Alameda Research नावाचं एक क्रिप्टो ट्रेडिंग हेज फंड 2017 मध्ये सुरू केलं होतं. सुरुवातीपासूनच FTX ने प्रोफेशनल ट्रेडर्ससाठी फ्युचर्स, लेवरेज, आणि इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स दिले.


    वाढ आणि लोकप्रियता (2019–2021)

    • २०२०–२१ मध्ये क्रिप्टो बूम आला, आणि FTX चं मूल्यांकन $32 अब्जांवर पोहोचलं. 
    • सेलिब्रिटी ब्रँडिंग, स्पोर्ट्स स्पॉन्सरशिप (Miami Heat Arena ला "FTX Arena" नाव दिलं), आणि जगभर विस्तार झाला. 
    • लाखो युजर्स, अब्जावधी डॉलर्सची डेली ट्रेडिंग व्हॉल्यूम, आणि FTX "विश्वासार्ह" एक्सचेंज म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
    • जलद वेगाने नवी ट्रेडिंग प्रॉडक्ट्स (फ्युचर्स, ऑप्शन्स, टोकनाइज्ड स्टॉक्स) सुरू केली.
    • मोठे गुंतवणूकदार : Sequoia Capital, SoftBank, Temasek, Tiger Global इ.

    मार्केटिंग स्टंट्स:

    • Miami Heat च्या स्टेडियमचे नाव "FTX Arena".
    • सुपर बाउल जाहिराती.
    • टॉम ब्रॅडी आणि गिसेल बुंडचेन सारखे सेलिब्रिटी ब्रँड अॅम्बेसेडर.

    सन फार्मास्युटिकल्सची यशोगाथा - दिलीप सांघवी

    समस्या सुरू होण्याची चिन्हे (2022 सुरुवात)

    1. Alameda Research आणि FTX यांच्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता नव्हती.

    2. FTX आणि Alameda Research हे दोन वेगळे बिझनेस असल्याचं सांगितलं जात होतं, पण प्रत्यक्षात दोघांचं फंड मिक्स होत होतं.

    3. युजर्सनी जमा केलेले अब्जावधी डॉलर्स Alameda मध्ये रिस्की क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटसाठी वापरले जात होते.

    4. अफवा होत्या की ग्राहकांच्या ठेवींचा वापर Alameda च्या ट्रेडिंग लॉसेस भरून काढण्यासाठी केला जात आहे.

    घोटाळा उघडकीस येणे (नोव्हेंबर 2022)

    • CoinDesk ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला, ज्यात दाखवलं की Alameda चा मोठा हिस्सा FTT टोकनवर अवलंबून आहे (FTX ने स्वतः जारी केलेलं टोकन).
    • Binance चे CEO Changpeng Zhao (CZ) यांनी ट्विट केलं की ते आपले FTT टोकन विकणार आहेत.
    • FTT ची किंमत कोसळली आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे काढायला सुरुवात केली.मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग सुरु झाली.

    दिवाळखोरी आणि पडझड (नोव्हेंबर 2022)

    1. काही दिवसांत FTX कडे ग्राहकांचे पैसे परत करण्यासाठी पुरेशी रक्कम नव्हती.

    2. 11 नोव्हेंबर 2022 -FTX, Alameda Research आणि 130+ संबंधित कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली.

    3. जवळपास $8 अब्ज ग्राहकांची रक्कम गायब.

    The Psychology of Money / पैशाचे मानसशास्त्र

    चौकशी आणि अटक

    • US SEC, CFTC आणि FBI यांनी चौकशी सुरू केली.
    • Sam Bankman-Fried याला डिसेंबर 2022 मध्ये बहामासमध्ये अटक.
    • त्याच्यावर फ्रॉड, मनी लॉन्डरिंग आणि इतर आर्थिक गुन्हे यांचे आरोप.
    • 2023 मध्ये US कोर्टाने Sam ला फसवणुकीचा दोषी ठरवले;आणि २०२४ मध्ये २५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली.

    जागतिक परिणाम

    • क्रिप्टो मार्केटवर प्रचंड परिणाम; अनेक टोकनचे भाव कोसळले.
    • जगभरातील गुंतवणूकदारांचा क्रिप्टो एक्सचेंजवर विश्वास डळमळला.
    • सरकारांनी आणि रेग्युलेटरनी क्रिप्टो नियम कडक करण्यास सुरुवात केली.

    FTX फेल होण्याची मुख्य कारणे

    1) ग्राहकांच्या ठेवींचा गैरवापर- Alameda ला मदत करण्यासाठी.

        FTX ही एक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कंपनी होती, जिथे लोक आपले पैसे/क्रिप्टो ठेवत आणि ट्रेड करत.परंतु तपासात कळलं की FTX चे मालक Sam Bankman-Fried (SBF) यांनी ग्राहकांचे ठेवलेले पैसे Alameda Research नावाच्या त्यांच्या स्वतःच्या ट्रेडिंग फर्मला दिले.

    • हे पैसे Alameda ने जास्त रिस्क असलेल्या व्यवहारांसाठी वापरले.
    • जेव्हा मार्केट खाली गेले, तेव्हा हे पैसे परत मिळाले नाहीत, आणि FTX कडे ग्राहकांना पैसे परत देण्यासाठी रक्कम उरली नाही.

    2) अयोग्य रिस्क मॅनेजमेंट -हेजिंग किंवा रिझर्व्ह योग्य ठेवले नाहीत.

        साधारणपणे, अशा मोठ्या एक्सचेंजेस ग्राहकांच्या ठेवांपैकी एक भाग रिझर्व्ह (सुरक्षित साठा) म्हणून ठेवतात, जेणेकरून अचानक पैसे काढण्याची मागणी आली तरी ती पूर्ण करता येईल.
    FTX ने हे नीट केले नाही:

    • Hedging म्हणजे मार्केट खाली गेले तरी नुकसान कमी ठेवण्याची रणनीती, पण त्यांनी हे केले नाही.
    • जेव्हा मार्केट कोसळले, तेव्हा कंपनीकडे सुरक्षित ठेव किंवा रिस्क कव्हर करण्याची पद्धत नव्हती.

    3) पारदर्शकतेचा अभाव - गुंतवणूकदार आणि ग्राहकांना खरी आर्थिक स्थिती न सांगणे.

        FTX ने बाहेरच्या जगाला (गुंतवणूकदार, ग्राहक, नियामक) सांगितले की कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे.

    • प्रत्यक्षात, आतून खूप मोठा आर्थिक तुटवडा होता.
    • Alameda ला पैसे देण्याची गोष्ट गुप्त ठेवण्यात आली.
    • यामुळे गुंतवणूकदारांचा आणि ग्राहकांचा विश्वास तुटला.

    4) एकाच व्यक्तीवर अवलंबून नेतृत्व -SBF ने सर्व निर्णय जवळपास एकहाती घेतले.

        SBF (Sam Bankman-Fried) हे FTX चे मुख्य संस्थापक होते, आणि जवळजवळ सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले.

    • एकाच व्यक्तीकडे सर्व सत्ता असल्याने चुकीचे निर्णय कोणी थांबवू शकले नाहीत.
    • कंपनीत योग्य बोर्ड, सल्लागार, किंवा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटप करण्याची व्यवस्था नव्हती.

    “A to Z सेंद्रिय भाजीपाला, धान्य आणि फळ शेती – सुरुवातीपासून संपूर्ण मार्गदर्शन!”

    शिकवण 

    ग्राहकांचा पैसा म्हणजे विश्वास.

    • ग्राहकांनी ठेवलेली रक्कम कधीही वैयक्तिक किंवा दुसऱ्या कंपनीच्या रेस्क्यू साठी वापरू नये.
    • पैसा वेगळ्या, सुरक्षित अकाउंटमध्ये ठेवणे हे कायदेशीर आणि नैतिक दोन्ही दृष्टिने आवश्यक आहे. 

    रिस्क मॅनेजमेंटला कमी लेखू नका. 

    • मार्केट बदल, चलनाचा उतार-चढाव, आणि अचानक होणारे नुकसान यासाठी हेजिंग, रिझर्व्ह फंड आवश्यक असतात.
    •  “सर्व काही ठीक चाललंय” असा अति आत्मविश्वास नुकसान वाढवू शकतो.

    पारदर्शकता - विश्वास टिकवण्याचं हत्यार. 

    •  गुंतवणूकदार आणि ग्राहकांशी खरी आकडेवारी, जोखीम आणि परिस्थिती स्पष्ट सांगणे गरजेचे. 
    •  काही माहिती लपवली तर, एकदा विश्वास तुटला की तो परत मिळवणं अवघड असतं.

    नेतृत्वात विविधता ठेवा. 

    •  सर्व निर्णय एकाच व्यक्तीवर अवलंबून असतील तर चूक होण्याची शक्यता जास्त.
    • अनुभवी आणि वेगवेगळ्या मतांचे लोक बोर्डवर असावेत, जे सल्ला आणि तपासणी करू शकतात.

    नैतिकतेला प्राधान्य द्या. 

    • शॉर्टकट्स, फसवणूक, किंवा नियम तोडणे काही काळासाठी यश देऊ शकते, पण दीर्घकाळात नाश ओढवते.