कृषिकन्या- काव्या दातखिळे / Krushi Kanya-Kavya Datkhile

  कृषिकन्या- काव्या दातखिळे

                                 विषमुक्त शेतीसाठी ७५ हजारांची सरकारी नोकरी सोडली.


    आपण रोजच्या आयुष्यात जे अन्न खातो ते किती natural आणि organic असतं याचा कोणी विचार करतं का? हा प्रश्न प्रत्येकाला विचारला तर 100% मधील फक्त 1 % लोक त्याचा विचार करत असतील बाकीचे त्याचा विचारही करत नाहीत. आज आज तुम्ही बघितला असेल प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेतावरती कीटकनाशके वेगवेगळे औषधे फवारण्या करत असतो किंवा रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. याचा परिणाम हा आपल्या शरीरावरती होतो .आजच्या लोकांना हृदयविकार  झटके हे कमी वयात येतात, याचं कारण म्हणजे हे अन्न आहे .आपण अन्न खात नाही विष खात आहे हेच बदलण्यासाठी कृषीकन्या काव्या दातखिळे यांनी विषमुक्त शेतीसाठी स्वतःचा सरकारी जॉब सोडून ते आज मातीची सेवा करत आहेत . सरकारी नोकरी हे अनेकांचं स्वप्न असतं. काव्याने ७५ हजाराचा पगार असलेल्या सरकारी नोकरीवर तुळशीपत्र ठेऊन मोठी रिस्क घेतली, जीवाणूयुक्त गांडूळखत तयार करायची. गांडूळ खत निर्मितीचे प्रकल्प  तसेच त्या अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण ही देखील देतात.

    वैयक्तिक जीवन

        काव्या ही मूळची पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील एका लहानशा खेड्यात राहणारी मुलगी लहानपणी तिचं पूर्ण ग्रामीण भागात गेले, तिला तीन बहिने होत्या म्हणजे तिचा आईला टोटल चार मुली होत्या चारी मुले होत्या म्हणून त्यांच्या आईला लोक बोलायचे सुयाना जन्म दिला आहे, आणि ती गोष्ट नेहमी कानावर ऐकू येत होते. याच्यासाठी त्यांच्या आईने गाव सोडून त्या चौघीना घेऊन मुंबईमध्ये गेली. मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासमोर असा प्रश्न पडला की इथे प्रवास कसा सुरू करायचा, कारण वडील तर गावी होते कारण त्यांच्याकडे परिस्थिती असल्यामुळे वडील शेती करण्यासाठी गावी राहिले आईने एकटीला चौघींना घेऊन प्रवास सुरू करणे हे खूप मोठी आणि खडतर प्रवास होता .हे जेव्हा वडिलांना कळले तेव्हा त्यांच्या वडिलांनी मुंबईला ते सुद्धा गेले. आणि तिथे त्यांनी रिक्षा चालवत आपल्या मुलींचे शिक्षण पूर्ण केले त्यांनी वीस वर्ष भाड्याच्या घरात मुंबईमध्ये राहिले आणि त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्या मुलींनी राख्या तयार करणे यासारखे छोटे-मोठे उद्योग देखील केले ते राख्या विकत होत्या त्याचा त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी त्याचा चांगलाच आधार भेटला. 

    हे पण वाचा

     शैक्षणिक प्रवास




        त्यांना वाटले की आता आपलं आपल्याला कॉलेज पूर्ण केले, पाहिजे म्हणून त्यांनी सायन्सला ऍडमिशन घेतलं सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर सकाळचे जो वेळ होता, तो पुन्हा कामात दिला  गेला, आणि संध्याकाळी ते कॉलेज करायचे अशी कुठेतरी लिंक लागत नव्हती. परंतु परसेंटेज चांगले पाहिजे होते मेडिकल क्षेत्रात जायचं होतं त्यामुळे त्यांनी बहिणीचे शिक्षण पाहिले. ते कमी पैशात पूर्ण झाली होती आणि भविष्यात त्यामध्ये सरकारी नोकरी सुद्धा भेटत होती. म्हणून त्यांनी सायन रुग्णालयात आपला फॉर्म भरला आणि नर्स म्हणून साडेतीन वर्षासाठी ट्रेनिंग करण्यासाठी संधी भेटली ते सांगतात की ते ट्रेनिंग त्यांना  भविष्यात कसे जगले पाहिजे हे ती शिकवले' तो जॉब करताना त्यांना एक टाइम लिमिट असायचा त्या टाईम लिमिटमध्येच आपण बाहेर पडायचं कोणाला भेटायचं ते भेटायचं सोबतच कधी घरी काही फंक्शन असेल तर त्यांना पूर्ण वेळ देता येत नव्हता. त्यामुळे त्यांना घरच्यांसाठी टाईम देता येत नव्हतं. कधी कधी त्यांना बॉडी बांधण्यापासून ते अगदी पेशंटची काळजी घेण्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या.  जॉब कसातरी पुढे ढकल लागेल ढकलत त्यांनी कम्प्लीट केला आणि नंतर ठरवलं की नंतर त्यांनी टाटा रुग्णालयात जॉब मिळाला त्यामुळे त्यांना  कॅन्सरच्या पेशंटची सेवा करण्याची नवीन  संधी भेटली . पेशंट असे फुटपात वरती एक्सपायर होताना पाहिले. आणि टाटाला जेव्हा ती नोकरी करतो त्यावेळी असे सिच्युएशन होती त्यामुळे कुठेतरी मनावर त्यांनी दगड ठेवला आणि विचार केला की आपल्या डोळ्यासमोर माणसं मरतात पण आपण काहीच करू शकत नाही यातूनही आपल्याला पुढे जायचं आहे पुढे जायचं आहे तर पुढे जायचं असेल तर आपल्याला एज्युकेशन घेतलं पाहिजे कारण हा प्रवास प्रवासामध्ये त्या खूप काही शिकल्या होत्या. घरच्यांचा पूर्णपणे पुढे एज्युकेशन घेण्यासाठी त्यांचा नकार होता. त्यांच्या घरच्यांचा विचार होता ही मुलगी आहे पुढे जाऊन इतर लग्न होणार शिक्षणाची काही गरज आहे.

         मग त्यामुळे त्यांना पूर्णपणे नकार दिला तरी पण त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन त्या पुण्यात गेल्या .तेथे घरच्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. पैसे सुद्धा नव्हते ट्रेनिंग साठी आणि कुठेतरी त्यांनी आपल्या  चार-पाच मुली मिळून एकत्र रू घेतली. त्यामध्ये त्या राहिल्या नंतर तिथला त्यांचा प्रवास खूप व्यवस्थित चालू झाला. त्यांनी पुण्यातील दोन वर्षाची एज्युकेशन कम्प्लिट खडतर परिस्थितीत तिने BA नर्सिंग पूर्ण केलं. झाल्यानंतर त्या पुन्हा मुंबईला गेल्या आणि कारण शेवटी कुटुंब हे ते तिकडेच होते. त्यामुळे त्यांना जाणं भाग होतं, त्यामुळे त्यांनी पुन्हा नर्स म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यातही सर्टिफिकेट सॅटिस्फॅक्शन नव्हतं म्हणून काही दिवसांसाठी त्या टीचर म्हणून काम करत होत्या. पण  लाईफ मध्ये पूर्णपणे मिळाली ती परमनंट पोस्ट ती साडेतीन वर्षासाठी होती पुन्हा बरेच काही शिकून गेली. त्यांनी पुन्हा नर्सचा जॉब स्वीकारला आणि ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये कामाला लागल्या.  ते पण कोविडमध्ये त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. तरी त्या जॉब करायला लागल्या हॉस्पिटलमध्ये सहा महिन्यांचा त्यांचा पिरेड संपल्यानंतर त्या क्वारंटाईन केले गेल्या. आणि पुन्हा दुसरी लाट आली जेव्हा त्यासाठी पुन्हा त्यांना रुग्णालय जॉब साठी जावे लागले. त्याच पिरियडमध्ये काळात त्यांना कोविड  झाला, त्यांना सात दिवस क्वारंटाईन केले .मेडिसिन देऊन इंजेक्शन देऊन त्या ठीक झाल्या बऱ्या झाल्या नंतर त्यांनी मनातल्या मनात कुठेतरी असं डिसाईड केलं होतं की आपण हे क्षेत्र थांबवून आता कुठेतरी वळले पाहिजे्त्यानी एक युट्युब वर व्हिडिओ अपलोड केला आणि त्यातूनच त्यांचा कुठेतरी कॉन्फिडन्स बुस्ट झाला. त्यामुळे त्यांना लक्षात आलं आपण you tube वरून खरंच काम करू शकतो.

    हे पण वाचा

    गोष्ट मराठमोळ्या ७/१२हाँटेल ची- राहुल सावंत

    व्यवसाय प्रवास



        त्यांचा जेव्हा युट्युब वरून व्हिडिओ पॉप्युलर होऊ लागले, तेव्हा त्यांनी सहा दिवस त्यांची ड्युटी असायची त्यामध्ये त्यातील दोन दिवस सुट्टी काढायच्या. आणि गावी जायच्या तेथील कृषी पर्यटन जुन्नर तालुक्यातील कृषी पर्यटन पहायच्या ,वेगवेगळ्या कृषी क्षेत्रांना ते भेट द्यायच्या. जगासमोर अन्न फार गरजेचे आहे हे जगासमोर मांडत असताना त्यांनी पहिला व्हिडिओ केला. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला .त्यांनी ठरवलं आता आपण शेती आणि शेतीला जोडून एक जोड व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र त्यांचा चैनल सुरू केला. आणि  त्यानंतर त्यांनी त्या प्रवासाला सुरुवात केली. युट्युब च्या प्रवास सुरू केला, त्यानंतर नवीन कंटेंट घेऊन ते यायला लागले वेगवेगळे व्हिडिओ शेतीबद्दल त्या युट्युब च्या चैनल वरती टाकत गेले. हे करत असताना त्यांना हॉस्पिटल साठी कमी वेळ द्यायला. लागला हॉस्पिटलचे बरे स्टाफ बोलायला लागले हे काहीतरी नवीन करते याच्यातून दिला लाख रुपये पैसा मिळत असेल .पण हे पण यातून पैसा तर भेटतच नव्हता पण यातून कॉन्फिडन्स मात्र मिळत होता. त्यांनी अनेक माणसे जोडली आणि you tube मधून सुरुवात केली. तसेच Instagram वरती पोस्ट टाक्यात गेल्या, आणि इंस्टाग्राम आणि युट्युब हा त्यांनी सोशल मीडिया वापरला त्यातून त्यांचा इंस्टाग्राम आणि you tube वरती जास्तीत जास्त शेतकरी जोडले गेले. you tube वर आता सध्या त्यांचे 128000 हून सबस्क्राईब आहेत. आणि इंस्टाग्राम वरती जवळपास 87हजार फॉलोवर आहेत. हे त्यांनी ठरवलं की आपल्याकडे कुठेतरी एक लाख भर लाखभर शेतकरी जोडले गेलेत, आपण एका नवीन व्यवसायाची जोड देऊ शकतो.

         म्हणून त्यांनी ठरवले की रासायनिक खताचा वापर जास्त केल्यामुळे त्यांच्या त्याचा परिणाम आपल्या शरीरावर शरीरावरती आरोग्य शरीरावरती होतो आरोग्यावर होतो. त्यामुळे मातीच्या आईसाठी त्यांनी संवर्धनासाठी काम सुरू ठेवलं. आणि त्यातच काही काम करत आहेत शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरुवात केली. आज त्यांचे कृषी काव्या कृषी काव्या गांडूळ खत प्रकल्प आहेत. त्यांचे स्वतःचे आहेत जुन्नर मध्ये हे सुरू करताना त्यांना घरच्यांची हा प्रवास सुरू करताना घरच्यांची साथ नव्हती. त्यांच्या आईची त्यांना साथ नव्हती तरी पण त्या स्ट्रगल करत त्यांनी आज इथपर्यंत आल्या. त्यांनी व्यवसाय तर सुरू केला पण त्यांना कृषी क्षेत्रातील झिरो नॉलेज होते त्यांच्याकडे फक्त मार्केटचा अभ्यास होता., त्याच बेसवर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला केला होता आणि त्यातूनच होती सहा महिन्यात हॉस्पिटल मधून त्यांना  लिटर यायला लागले  की तुम्ही पुन्हा जॉईन होऊ शकता काही कारण आहे ते आम्हाला सांगा.  त्यांच्याकडून त्यांना पुन्हा जॉईन करून घ्या परंतु कुठेतरी त्यांना त्यावेळेस त्यांचे कॅल्क्युलेशनच्या सुट्ट्या जास्त झाल्यामुळे त्यांना जॉब वरून काढून टाकले गेले.  पूर्णपणे तुटून गेल्या होत्या कारण व्यवसाय तर त्यांना इतका चांगला प्रतिसाद मिळत नव्हता.  तेही बेस क्लियर करण्यासाठी वेळ घेतो आणि त्यातही त्यांच्या हातातून हा जॉब गेला होता त्यामुळे त्या दोन्ही मुळे तळमळत होत्या दोन्हीकडून त्या पूर्णपणे तुटल्या होत्या पण त्यांनी त्याच दिवशी त्यास वेळी  त्या मुंबईचा जॉब हातातून गेला सरकारी नोकरी हातातून गेली त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की त्यांच्याकडे ऑप्शन एकच होता की जे ठरवलं आहे .

        गावी आल्यानंतर जेव्हा त्या शेतकऱ्यांना पुन्हा  काम करायला सुरुवात केली. काम  होते की मातीच्या आरोग्याची सेवा  करायचं शेणात हात घालायचा आणि शेतकऱ्यांना खूप कमी शेतकरी यासाठी खूप कमी लोक कमी लेखू लागले. त्यांना म्हणायला लागले तुम्ही सरकारी नोकरी सोडून 75000 चा जॉब सोडून इतर इकडे या मातीत काय करताय काही होणार नाही, असे लोक शेतकरी त्यांना बोलत होते त्यामुळे कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स अजून कमी होत गेला. त्यांना वाटत होते खरंच या मध्ये काम करू शकेल का पण त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल होतं. शेतकऱ्यांनी एकत्र करून एकत्रित आणि शेतकऱ्यांचा संगे गांडूळ खत महत्त्वाचं का आहे शेतकऱ्यांना एकत्रित घेणे आणि कुठेतरी  लिमिट होतं परंतु त्यांच्या लक्षात आले ,की आपला यूट्यूब चैनल आहे त्यानंतर त्यांनी you tube चैनल वर  त्यांचा जो प्रवास आहे तो अपलोड केला. म्हणजे अगदी सुरुवात कशी केली अगदी मार्केटिंग पर्यंत आपण गांडूळ खत कसे तयार करू शकतो सेंद्रिय शेती मातीची किती गरज आहे, बद्दल त्यांनी एक संपूर्ण 15 ते 20 मिनिटांचा व्हिडिओ बनवला तो युट्युब ला अपलोड केला आणि त्यात त्यांना 60000 व अधिक व त्यांचा वायरल झाला. त्यांना जशी ऑर्डर येऊ लागली. त्यांना एक ऑर्डर आली ची तो त्यांचा खत होता ते सहा महिन्यापासून पेंडिंग होतं एकच ऑर्डर आली ते पाच टनाची त्यातून त्यांना एका दिवसात 50 हजार रुपयांचा प्रॉफिट झाले त्यांनी कुठेतरी ठरवलं त्यांनी कुठेतरी ठरवलं. 

        आपण एक गांडूळ खत निर्मिती करू, कारण ते कधी तर ते विकले जाऊ शकते. ते शाश्वत शेतीमध्ये मोडतं त्यामुळे ते कधीही एक्सपायर होणार नाही. आणि आपलं काम कधी थांबवायचं नाही. हे त्यांनी ठरवलं आणि तेथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला त्यानंतर बऱ्याच वेळाने वेळाने घरच्यांनी देखील अजूनही तुला वेळ गेला नाही अजून तो हॉस्पिटलमध्ये काम कर असे असेही त्यांना सांगत होते. पण त्यांना व्यवसाय करायची इच्छा होती. आज कृषी काव्या गांडूळकता प्रकल्प ब्रँड होत आहे .जून २०२२ काव्याने स्वतःच शेड उभारलं आणि कामाला सुरुवात केली. सुरुवातीला तिच्या प्रयत्नांना नाक मुरडून पुढे जाणारे अनेक मिळाले. तरुण युवक त्या क्षेत्रात वळत आहे त्यासाठी त्या आज प्रशिक्षण देखील देत आहेत, अनेक नवनवीन तरुण त्या क्षेत्रामध्ये  घुसत आहेत.आज काव्या ५ गुंठा जमीनीत काम करते. गांडूळखताचं महिन्याचं उत्पादन साधारण १५ ते १६ टन आहे ज्यातून तिला साधारण दीड लाखांचा नफा होतो. शिवाय वर्मीवॉश, गांडूळ बीज उत्पादन ती घेते. एवढंच नाही तर वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग घेऊन लोकांना याबाबत educate सुद्धा करते. आज तिचं विषमुक्त शेती करण्याचं स्वप्न पूर्ण होतंय आणि ती अनेक शेतकऱ्यांना मदत करतेय.


    हे पण वाचा

    दुग्ध व्यवसाय / Dairy Farming

    Instagram /You tube 





        आज कृषीकन्या काव्य यांच्या youtube चैनल वरती ,जवळपास 128 हजार सबस्क्रायबर आहेत. आणि इंस्टाग्राम वरती त्यांच्या जवळपास 87 हजार एवढे फॉलोवर आहेत. इंस्टाग्राम youtube यासारख्या सोशल मीडियाचा वापर करून त्या एक प्रकारे मार्केटिंग करत आहेत. आज त्यांचा जवळपास 25 लाख रुपये वर्षाचा टर्नओव्हर आहे ते पण ग्रामीण भागात राहून.

    हे पण वाचा

    सन फार्मास्युटिकल्सची यशोगाथा - दिलीप सांघवी(Success Story Of Sun Pharmaceuticals - DILIP SHANGHVI )

    पुरस्कार



        कृषी कन्या काव्य यांना आत्ताच लेटेस्ट झी युवा चा बळीराजा पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यानंतर तसेच त्यांना अनेक पुरस्कार भेटले आहेत जसे की  कृषी विज्ञान पुरस्कार ,ॲग्रोवनचा कृषी विस्तार पुरस्कार, शिवभूमीची शिवकन्या पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत.

        या सगळ्याची सुरुवात झाली ती मातीशी असलेल्या connection मधून. आपण सगळे या मातीतून जन्माला आलो आणि शेवटी मातीतच जाणार आहोत.

    हे पण वाचा

    आईस्क्रीम उद्योग / Icecream manufacturing business