आज आपण हॉटेल ७/१२ ची यशोगाथा पाहणार आहे. आज महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, गोवा या राज्यात ही प्रसिद्ध आहे, ७/१२ हे नॉनव्हेज साठी प्रसिद्ध आहे. हॉटेल व्यवसाय राहुल सावंत आणि त्यांची बायको सोनाली सावंत हे यशस्वीरित्या चालवत आहेत.
७/१२ हॉटेलचे मालक -राहुल सावंत
कोल्हापूर मध्ये एका सर्वसामान्य कुटुंबा मध्ये त्याचा जन्म झाला. त्याचं वडील रिक्षा ड्राइवर होते. त्यांना तीन बहिणी आहेत.असा त्याचा छोटासा कुटुंब होतं. लहानपणापासून गरीबी पाचवी ला पुजलेली. कुटुंबात फक्त वडिल च कमावणारे होतं. या सगळ्या प्रवासा मध्ये त्यांनी खूप कष्टा तून आणि खूप मेहनती तून या सगळ्या कुटुंबा ला उभं केलं. ते १० वी नापास आहेत त्यांनी सुरुवातीला छोटी मोठी कामे करत . कपड्या च्या दुकाना मध्ये मोबाइल च्या दुकाना मध्ये झेरॉक्स सेंटर मध्ये त्यानंतर एमआयडीसी मध्ये हमालीच काम केले ते दिवसभर हे कामं करायचे आणि संध्याकाळी ६:०० ला चहा ची टपरी लावायचा. ते तहसील दार आफिस ला सात बारा लिहायचे.
त्यांनी नतर प्रॉपर्टी एजंट म्हणून काम साधारण २००५ ते २०१८ पर्यंत केलं. राहुल सावंत म्हणतात तो प्रवासा प्रॉपर्टी एजंट नंतर इन्वेस्टर , इन्वेस्टर नंतर फायनान्स आणि फायनान्स नंतर कन्स्ट्रक्शन व्यवसाय असा तो साधारण १०-१२ वर्षांचा प्रवास होता. तो अगदी सुरळीत होता. या व्यवसाया मध्ये खूप चांगली प्रगती केली. खूप चांगले पैसे मिळाले, पण नोटबंदी चा जो निर्णय शासनाच्या झाला त्यानंतर आमच्या कन्स्ट्रक्शन च्या व्यवसाया ला उतरती कळा लागली. आणि ती उतरती कळा लागली असताना उत्पन्ना चा काही तरी दुसरं साधन शोधायचं असं त्यांनी ठरवलं. ते अॅक्सिडेंट ली हॉटेल इंडस्ट्री मध्ये आलं.
७/१२ चा जन्म
त्यानं हॉटेल इंडस्ट्री मध्ये आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला चहा चा व्यवसाय चालू केला. चहा च्या व्यवसाया तून हॉटेल इंडस्ट्री मध्ये आलं. जेव्हा या इंडस्ट्री मध्ये आलं तेव्हा त्यांनी कल्पना ही नव्हती की या व्यवसाया मध्ये काहीतरी खूप मोठं नाव , एक मराठी माणसा चा ब्रॅन्ड तो तयार करून तो महाराष्ट्र भर पसरेल याची कल्पना ही नव्हती. ते चहा चा व्यवसाय चालू केला तेव्हा त्यांच्या मित्रा चा होटल होतं. त्या हॉटेल व्यवसाय च्या दारा मध्ये त्याच्याकडून जागा मागून घेतली होती. तिथे चहा चा व्यवसाय सुरू केला.
चहा चा व्यवसाय संध्याकाळी साधारण सहाची टाईमिंग संध्याकाळी ४:०० ला चार ते आठ संध्याकाळी ४:०० तासा मध्ये साधारण १५-२०००० रुपयांचा धंदा व्हायचा . मित्रांचा दिवसभरा चा हॉटेल चा व्यवसाय ३-४ हजार, आणि त्याचा चहा चा धंदा १९-१५०००. त्यामुळे तो मित्र होटल ब़द करत होता. तेव्हा त्यांच्या डोक्या मध्ये होत की त्याने जर हॉटेल व्यवसाय बंद केला तर मी कुठे जाणार त्यामुळे तो गाळा घ्यावा. एखादा छोटा होटल काढावं जें ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवावा आणि चहा चा व्यवसाय व्यवस्थित सुरू चालला होता. त्यातून चांगले पैसे मिळत होते अशा पद्धतीने ते करायचं ठरवलं.
कालांतरानं असं झालं की चहा चा व्यवसाय सुरू केला. जा ठिकाणी त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांची कोल्हापूर मध्ये खाद्य पंढरी म्हणून ओळख ली जाणारी खाऊगल्ली होती. त्या खाऊ गल्ली मध्ये व्यवसाय करत असताना काय करायचं? कारण तिथे वडापाव पासून ते बर्गर सॅण्डवीच पासून ते अगदी साऊथ इंडियन पासून सगळे पदार्थ मिळायचे. त्या स्पर्धे च्या ठिकाणी काय करायचं तर त्याची सासरवाडी सोलापूर साइट ची होती तर तिकडे काळ मटण असतो. तो स्पेशल होता. कोल्हापूर म्हटलं की लोक तांबडा पांढरा रस्सा प्रकाशन मागतात
पण त्या गर्दी मध्ये सगळे काळा रस्सा काळे मटण ही नवीन कॉन्सेप्ट चालू केलं. कोल्हापूर आणि पुणे चे लोकं जास्त प्रमाणात येतात .सगळ्या ब्रांच ला मोस्ट ली कस्टमर्स पुणे येथील आहेत. ते म्हणतात या सगळ्या लोकांनी इतका प्रतिसाद दिला की मला तीन महिन्यां नंतर चहा चा व्यवसाय बंद करावा लागला. होटल इतक्या तेजीत चालत होतं त्यावर तो व्यवसाय बंद केल्यानंतर होटल कंटिन्यू केलं ते कंटिन्यू केलं म्हणजे साधारण दोन ते तीन महिने चालवलं.
दोन ते तीन महिन्यांमध्ये त्या ५०० स्क्वेअर फुट मध्ये जागा कमी पडू लागली. ५०० स्क्वेअर फुट मधून ५००० स्क्वेअर फुट मध्ये तो व्यवसाय शिफ्ट केला. जेव्हा ५०० स्क्वेअर फुट मधून ५००० स्क्वेअर फुट मध्ये शिफ्ट केला. ५००० स्क्वेअर फुट जागा कमी पडायला लागली आणि त्या ५००० स्क्वेअर फुट मधून लगेचच दोन महिन्या नंतर २०००० स्क्वेअर फुट मध्ये होटल शिफ्ट केलं आणि तो प्रवास आलेख असाच वाढत वाढत वाढत गेला. मध्ये २०००० स्क्वेअर फूट मधून कोल्हापुरातून सातारा तालुका सातारा तून त्यांना पुणे ते लोणावळा लोणावळा ते सासवड, सासवड मधून रांजणगाव चा सगळा प्रवास करून मग परत एकदा कोल्हापूर मध्ये जी जन्मभूमी कर्मभूमी आहे तिथे फिरून परत एक मोठं हॉटेल काढायचं स्वप्न होतं की एकाच छता खाली सगळंच. म्हणजे आत्ताच्या तीन जनरेशन आहेत म्हणजे आपण स्वतः आपली मुलं आणि आई वडील हेच म्हणजे मुलांना पिझ्झा बरोबर खायचा असतो आपल्याला पावभाजी सँडविच खायचं असतं आई-वडिलांना पुरणपोळी या साठी कोणीतरी अड्जस्टमेंट करतो तर हे सर्व एकाच ठिकाणी भेटावे या संकल्पनेतून कोल्हापूरच्या अलीकडे कोल्हापूरच्या वेशी जवळ एक फुडमाल चालू केला.
आईस्क्रीम उद्योग / Icecream manufacturing business
७/१२ फूड मॉल
सातबारा फूड मॉल तयार केलं जसं की आत्ताची पिढी मराठी संस्कृती महाराष्ट्रीयन संस्कृती जी विसरत चालले आहे. त्यासाठी एक गाव तयार केलं आहे. ज्यानं करून आताची पिढी आपली संस्कृती विसरु नये. हॉटेलच्या आत मध्ये गेल्यानंतर वडापाव भजी चायनीज पंजाबी कॉन्टिनेन्टल साउथ इंडियन डिश पिझ्झा बर्गर सँडविच फिश पुरणपोळी उकडी चे मोदक असून ते कोल्हापुरी चप्पल लोणावळा चिक्की ,कॉटन कॅन्डी ,फोन, लाकडी खेळणी ,अगरबत्ती या पर्यंत सर्व गोष्टी मिळतात. हे सर्व लोकांना आवडायला लागले. किणी ,कोल्हापूर येथे फुडमाल आहे.
७/१२ नावाचं महत्त्व
त्यानं तहसीलदार ऑफिसमध्ये सातबारा लिहिणयाचे काम केले होते.आणि ते नाव कुठेतरी आयुष्यात पाठीशी राहिला पाहिजे म्हणजे तहसीलदार ऑफिसमध्ये सातबारा लिहिणे . या उद्देशाने हॉटेलला नाव देताना सातबारा असे नाव दिले.
संघर्ष
ते म्हणतात सारे मराठी व्यावसायिक आहेत. त्यांना मराठी माणसा ची प्रगती बघवत नाही का? एखाद्या ची प्रगती रोखली जाऊ शकत नाही. कुठल्याही पार तेव्हा त्या ची बदनामी चालू केले तसेच बदनामी माझी झाली या व्यवसायात आल्यानंतर खूप सारे अडचणी आल्या.
मध्ये लोकांनी साम दाम दंड भेद, सगळे प्रकार वापरले. अगदी मारून टाकण्या इतपत मजल गेली आठवला की अंगावर काटा मारतो खरं कारण तो खूप वाईट प्रसंग आले आपण जे करतो ते आपल्या फॅमिली साठीच करतो तर फॅमिली नसेल तर त्याचा काय उपयोग ,एक वेळ आशा आली होती की सर्व काही सोडून द्यावा. पण त्यांची बायको पाठीशी उभी होती. यशस्वी पुरुषामागे एक स्त्री चा हात असतो. लोकांनी खूप त्रास दिला गेला होता. हतबल झाले होतं . पण त्यांनी आणि त्यांच्या बायकोने जिद्द सोडली नाही.मराठी मध्ये एक म्हण आहे की हुसकावून खाणाऱ्याचे कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही.
डिस्काउंट
हॉटेल सातबारा हे शेतकरी व आर्मी ऑफिसर असतील त्यांच्यासाठी जास्त डिस्काउंट देत आहेत . महाराष्ट्रातील पहिले च हॉटेल आहे जिथे हॉटेलमध्ये शेतकऱ्यांना २५% व जवानांना २५% डिस्काउंट दिला जातो याच्या साठी आम्ही त्यांना २५% डिस्काउंट दिला जातो याच्या साठी शेतकऱ्यांनी सातबारा दाखवावे व जवानांनी आयडी कार्ड दाखवावे. यांच्या पाठीमागे उद्देश हा होता की ज्याच्यामुळे आपण पोटभरून खातो व संध्याकाळी आनंदाने झोपतो. ते जर ७/१२ ला आले तर त्यांना आदराचे आपुलकी चे स्थान असावे यासाठी त्यांनी २५% डिस्काउंट दिलेला आहे.
जेव्हा हॉटेल व्यवसाय चालू केला तेव्हा २०१७-१८ला महापुर आला. त्या काळामध्ये साधारण २२००० जेवणाचे पॅकेट त्यांनी लोकांना वाटप केली होते आणि त्यानंतर गणेशोत्सवाला होणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी एक नवीन आयडिया शोधली की त्यांनी एक आयडिया सुचवली की तुम्ही आम्हाला मूर्ती दान करा आम्ही तुम्हाला त्याबद्दल ५०% डिस्काउंट देऊ त्यानंतर ५५०० मुर्ती जमा झाल्या. त्यांनी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी रोटी डे सेलिब्रेट करायला सुरुवात केली रस्त्यावरती गरीब लोक, अनाथ आश्रम त्यांना गरज आहे अशा लोकांना त्यांनी जवळपास दहा हजार पॅकेट दान केली. कोरना च्या काळात त्यांनी जे सफाई कर्मचारी हेल्थ वर्कर डॉक्टर यासारख्या लोकांना साधारणत ३५००० पॅकेट वाटप केली.
शाखा
- किणी, वाठार ,कोल्हापूर
- उचगांव, कोल्हापूर
- शेंद्रे फाटा ,सातारा
- वरसोली टोल प्लाझा, लोणावळा
- दिवे घाट, केळेवाडी ,सासवड
- खंडाळा माथा, रांजणगाव
- सोलापूर पुणे हायवे, इंदापूर
आज त्यांच्या कितीतरी अशा शाखा आहेत महाराष्ट्र ,कर्नाटक गोवा या राज्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर येथे त्यांची मेन शाखा आहे.सात बारा हाँटेल ला भेट दिली च असेल तुम्ही जर दिली नसेल तर नक्की भेट द्या.