5000 रुपयांपासून 3 कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास / Patilkaki

 

Patilkaki 


पाटील काकी.............
    पाटीलकाकी म्हटले की आपल्या पुढे येत ते मराठीमोळ कुटुंब. अशाच एका कुटुंबातील आपल्या पाटील काकीने  चालू केलेल्या एका Startup बदल आज आपण बघणार आहे.ज्याला बिझनेस करायचा आहे त्याला कधी वय आडवं येत नाही. हे सिद्ध केलं आपल्या पाटील काकी ने.  मुंबई मध्ये राहणाऱ्या ४७ वय असणार्या काकी ने चालू केलाय स्वतःचा उद्योग , PatilKaki  या नावाने त्यांनी स्नॅक्स चा बिझनेस घरातुन चालू केला, त्यांनी सुरुवातील ५ हजार रुपयांहून सुरू केलेला बिझनेस आज करोडो रुपयांचा झाला आहे.

    प्रवास 



         २०१६ मध्ये गीताचा पती गोविंद यांची नोकरी गेली. दोन लहान मुलं शिकायला , त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं होतं. गीता, ज्यांना तिच्या आईकडून स्वयंपाक कौशल्याचा वारसा लाभला होता, ती तिच्या शेजाऱ्यांसाठी स्वादिष्ट स्नॅक्स तयार करत असे. तिच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गीताने तिच्या स्वयंपाकाच्या कौशल्याचा फायदा घेण्याचे ठरवले. आणि म्हणून तिने प्रभात कॉलनीत बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना टिफिन पुरवायला सुरुवात केली. २०१६  ते २०२०  पर्यंत तिने महिन्याला सुमारे एक लाख कमावले.

        अनेक वर्ष यशस्वी टिफिन उपक्रम चालवल्यानंतर, गीताचा मुलगा विनित पाटील  तिच्या व्यवसायात सामील झाला. मार्केटिंग बद्दलच्या त्याच्या ज्ञानामुळे, त्याने त्याच्या आईला तिचा व्यवसाय वाढवण्यास मदत केली. आईचा बिझनेस चालू असताना आई ला मदत करण्यासाठी वयाच्या १९  वर्षी त्यांन मार्केटिंग व इतर बिजनेस मध्ये  वापर केला जसे की  कंपनीची वेबसाईट. विनीत पाटील यांनी एसएससी नंतर कॉलेज सोडल  आणि त्याने जवळपास आठवीपासूनच कोडींग शिकला आहे त्यामुळे त्याला पुरेसे पैसे भेटत होते त्यामुळे तो  पुढे शिकला नाही.  विनीत आणि दर्शले हे  मित्र आहेत , त्यांचा प्लॅन होता की एखादी कंपनी चालू करण्याचा होता त्यानंतर हळूहळू त्याना  ऑनलाईन ऑर्डर भेटू लागले,  त्याचा मित्र दर्शशील यानेही त्याच्या मदत करण्याचे ठरवलं आणि त्या तिघांनी मिळून विनीत, गीता आणि दर्शशील मिळून सुरुवात केली. सुरुवातिला पाच हजार रुपये पासून स्टार्ट केलेला बिजनेस आज तीन कोटीचा झालेला आहे. त्यांनी मुंबईमध्ये होम स्टाईलने  स्नॅक्सचा बिझनेस PatilKaki या नावाने सुरू केला आहे.

        अनुराधा जोहरी गेल्या काही काळापासून पाटील काकींकडून महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ मागवत आहेत. ती म्हणते, “हे चव आणि दर्जा दोन्हीमध्ये उत्तम आहे. पाटील काकींची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची सेवा. त्यांचा संघ छान आहे, जो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्वरित देतात  आणि काही मिनिटांत समस्या सोडवल्या जातात. वेळेवर वितरण देखील त्यांना खास बनवते.

    प्रोडक्टस 

        पाटीलकाकींच्या ई-स्टोअरवर, तुम्हाला देसी तूप बेसन लाडू, डिंक लाडू, रवा लाडू, मेथी लाडू, प्रोटीन लाडू यांसारखे विविध प्रकारचे लाडू मिळतील जे आरोग्यदायी आणि चवदार आहेत. चकली आहे, मोदक आहे , सुंदर पुरणपोळी आहे. तुम्हाला चिवडा, कचोरी, करंजी, शंकरपाळी,  उकडीचे मोदक, पुरणपोळी, लाडू यासारखे अनेक पदार्थ ते विक्री करतात त्यांचं आता जवळपास १८०००  कस्टमर झालेले आहेत आणि सर्व ऑर्डर ह्या त्यांच्या वेबसाईट कडून  आहेत असे ते सागतात. त्यांणचे  सर्वात जास्त मोदका  आणि पुरणपोळी हे  प्रोडक्ट सर्वात जास्त सेल होणार आहेत. 

    हे पण वाचा, 

    भविष्यातील योजना

        त्यांचे एक विजन आहे की ऑल इंडिया त्यांना प्रॉडक्ट सेल करायचे आहेत असे ते सांगतात.  त्यांचे अॅवरेज  सेलिंग प्राईस ६५०  रुपये आहे. लवकरच इतर शहरांमध्येही ते सुरू होईल. गीता सांगते की, तिचा बिझनेस इतका पल्ला गाठेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. ती म्हणते, “या व्यवसायाच्या यशाने मला कधीकधी खूप आनंद मिळतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे मार्केटिंग कसे करावे हे मला स्वतःहून कधीच कळणार नाही. या सगळ्यामागे विनीतचा हात आहे. दर महिन्याला ३०००  हून अधिक ऑर्डर पाठवल्या जाणार्‍या, ब्रँडने लवकरच आपली सेवा इतर शहरांमध्ये विस्तारित करण्याची योजना आखली आहे. 

    स्टार्टअप बदल   

        एकूण  सेल ही २०२१  ते २२ मध्ये १.४ कोटी  झाली होता , त्यानंतर २०२२  ते २०२३  यावर्षी त्यांची आतापर्यंत एक करोड रुपये झाले आहे त्यांचं  म्हणणं आहे की या वर्षअखर  तीन करोड रुपये इथपर्यंत त्यांची सेल जाईल. त्यांना जवळपास ५५% हे क्रॉस मार्जिन भेटतं. त्यांणचे  सर्वात जास्त मोदका  आणि पुरणपोळी हे  प्रोडक्ट सर्वात जास्त सेल होणार आहेत. त्यांचे अॅवरेज  सेलिंग प्राईस ६५०  रुपये आहे.  त्यांचं आता जवळपास १८०००  कस्टमर झालेले आहेत. २०१६ ते २० मध्ये महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न टिफिन सेवा देऊन केलं व इतर पूड वगैरे त्या विकत होत्या लाकडाऊन मध्ये सुरुवात झालेला हा बिजनेस जवळपास ३ कोटी चा झाला आहे.  आज ३० प्लस  महिला वर्कर  आहेत.  त्यांचं सांताक्रुज येथे मोठे किचन  आहे तिथे  स्नॅक्स तयार करतात.  त्यांचं सर्वात जास्त मोदका हा प्रोडक्ट सर्वात जास्त सेल होणार आहे. 

    शार्क टॅंक इंडिया  

        शार्क टॅंक इंडिया मध्ये आले होते तेव्हा त्यांनी आपला बिजनेस कसा आहे, सर्व सांगितल्यानंतर त्यांनी ४०  लाखासाठी २.५ % इक्विटी मागितली सर्वांनी जवळपास त्यांना ऑफर दिली होती, त्यानंतर अनुपम आणि पीयुष यांनी ४०  लाख ४ % इक्विटीसाठी १० कोटी च्या व्हॅल्युएशनवर त्यांना ऑफर दिली, अमन ने ४० लाख ५% इक्विटीसाठी ऑफर दिली, विणीता ने ४० लाख १०% इक्विटीसाठी ऑफर दिली. त्यांनी शेवटी अनुपम मित्तल आणि  पीयुष यांची  ऑफर स्वीकार केली. त्यांचे  प्रॉडक्ट एक नंबर आहेत.  त्यांची करंट शेल्फ लाइफ प्रोडक्टची हे जवळपास २५  ते ३०  दिवसाच्या आहे.  ते दोन ते तीन महिन्यापर्यंत त्याचे  शेल्फ लाईफ ही वाढू शकते. त्यनि या आधी ही  फंडिंग घेतले आहे ते दहा करोड व्हॅल्युएशनवर पहिल्यांदा ७.५ लाख आणि  दुसरदया २९  लाख  घेतल आहे. 

    हे पण वाचा,

    ऑर्डर करा 

        हे सर्व घरी स्वच्छतेने तयार केले जाते आणि लोक चाहते आहेत. पाटील काकींचे वचन आहे की जर तुम्हाला चव आवडत नसेल तर तुम्हाला १००% परतावा मिळेल. पण आम्हाला खात्री आहे की ते कधीच होत  नाही. स्वयंपाकघर सांताक्रूझच्या बाहेर स्थित आहे आणि दररोज सकाळी १० ते रात्री ९  दरम्यान चालते. या गुडीज फूड एग्रीगेटर साइटवर देखील उपलब्ध आहेत. किंमत गुण अगदी परवडणारे आहेत आणि तुम्हाला आरोग्यदायी, घरगुती स्नॅक्स तुमच्या दारात मिळतिल,  सणासुदीच्या काळात त्यांच्याकडेही ऑफर असतात, त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. तुम्ही त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकता , त्यांना Instagram वर DM करू शकता किंवा +91 85913 36124 वर कॉल करून बुक करू शकता. 

    हे पण वाचा,