आज स्त्री सुरक्षित आहे का??.......

                                                    आज स्त्री सुरक्षित आहे का??..

           


 आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात , तसेच प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करताना प्रगती पथावर आहे.  साहजिकच पूर्वीपेक्षा आताच्या युगात स्त्रीला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले आहे यात शंकाच नाही. एकूण सर्वच बाबतीत स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत. आणि यापुढेही असणार आहेत.

             हे जरी खरे असले तरी या सर्व गोष्टी काही ठराविक व मर्यादित आहेत. काही ठराविक स्त्रियांच्या बाबतीत खऱ्या आहेत. तर काही स्त्रिया बाबत चुकीचे आहे स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे असे म्हटले तरीही तिच्यावर अन्याय होताना आजही दिसून येतोच आहे. 

             आजही आपण वर्तमानपत्र ,सोशल मीडिया उघडले कि जास्तीत जास्त स्त्रीयांबाबाताच्याच अन्यायाच्या बातम्या जास्त असतात. नवविवाहितेच्या आत्महत्या, सुनेचा छळ करून मारले,  सर्वात जास्त बलात्कार करून तिची निर्घुण हत्या अश्या बातम्याच जास्त असतात.

                  21 व्या शतकात स्त्री ची प्रगती झाली त्याबरोबर स्त्री वर होणारे अत्याचार देखील वाढलेले दिसुन येतात. हा अत्याचार का वाढला यांची माझ्या मते काही काही कारणे आहेत ते आपण बघू या.  तुमची काही कारणे असतील तर टिपणी करा. 


1) भारतीय संस्कृती -

                   भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील रयत जवळपास 100%शेती करत होती, आता विचार केला तर ते उलट आहे. भारत प्रगती करत आहे पण त्या बरोबर तो मात्र आपल्या  भारतीय संस्कृती ला विसरत चालला आहे. आधि चा विचार केला तर भारतीय स्त्री ही एक भक्कम, मजबूत होती,  तिची कपडे, केशरचना, अशा अनेक गोष्टीत ती सरस होती,  आधीच्या लोकांच जेवण, राहणीमान हे उच्च होत. 

                   या विरुद्ध आज ची स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे पण तिने भारतीय संस्कृती जपली नाही असे ही म्हणता येत नाही आजही खेडे गावात भारतीय संस्कृती जपली जात आहे. आजच्या स्त्री या ची कपडे, केशरचना ,अन्न . आजच्या युगात मानव हा जेवण करत नाही तर तो विष खात आहे कारण रसायनिक खतांचा वापर,  आज च्या स्त्री ही भक्कम नाही कारण शारीरिक काम केलं जातं नाही अशा बराच गोष्टी आहेत. आपण आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे. 


2) इंटरनेट - 

              ही युग इंटरनेटचे आहे यामुळे आपल्या  फायदे होतात त्या बरोबर तोटे होतात. या इंटरनेट मुळे प्रेम प्रकरण वाढीस लागली. सोशल मीडियावर वरून मुली ला प्रेमात पडुन तिची संपत्ती लुटने ,लौंगिक अत्याचार करणे,  blackmail करणे. या टि वी मधल्या चित्रपट ,मालिका या मुळे  आताची लहान मुले देखील प्रेमात पडतात  अशा बराच गोष्टी आहेत. 

                      आईला स्वत:च्या मुलासाठी वेळ नाही. आई च्या हातात मोबाइल समोर टि वी. आई च त्या मुलाकडे लक्ष च नसत असत त्या मोबाईल मध्ये आणि वरुन बाळाची आई म्हणते माझी मुलगी राणी लक्ष्मीबाई सारखी झाली पाहिजे माझा मुलगा शिवाजी महाराज सारखा झाला पाहिजे, कसा होणार त्या साठी त्या आईला  जिजाऊ साहेब याच्या सारख बनावे लागेल. 


3) माणुसकी -

            हा समाज एवढा बदला आहे की आपल्या जवळ वाईट काही घडत असताना देखील त्याला थांबवण्याचा प्रयत्न सुध्दा करत नाही, अशा बर्‍याच घटना आहेत त्या वेळी ते थांबवले जाऊ शकत होत . पण तसे झाले नाही.  हे  जग बदलत तसे माणुसकी संपत आहे. 


4) वाईट द्रष्टीकोन -

                आज बघण्याचा दृष्टिकोन खूप बदला आहे. याला जबाबदार कोण??  हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रथम म्हणजे आई वडिलांची शिकवण /संस्कार,   सोशल मीडिया, इंटरनेट सर्च, मित्रांची संगत हे जबाबदार आहेत.


5) लोकसंख्या -

                प्रत्येक ला मुलगा पाहिजे मुलगी मात्र नको का पण? लग्नासाठी मुलगी पाहिजे असे का?  पुरुषांची संख्या ही जास्त आहे आणि स्त्रीयांची कमी यांचे कारण स्त्री भ्रूण हत्या, मुलगी झाली की मारणे,  सोडुन देणे. अशी बरीच कारणे आहेत. 


        स्त्री हि जगाची जननी आहे. ती तुमची आई,  बहिण, आजी, मावशी, मैत्रीण, आत्या, मामी आहे . तरीपण असा हा अत्याचार कशासाठी?? 

                      यात सर्वात मोठी चुकी ही सरकार ची आहे,     आरोपी ला शिक्षा सुनावली जात नाही.  या मध्ये बरेच आरोपींना शिक्षा होत नाही, त्यातील काही जेल मधुन पळुन  जातात, काही फाशी चा नंबर येई परत जेलमध्ये मरतात. अशा गोष्टीला जबाबदार कोण?  सरकार च ना? 

                         छ. शिवाजी महाराज च्या राज्यात जर कोणी चोरी केली तरी त्यांचे हात कापले जायचे मग विचार करा बलात्कार केल्या नतर काय शिक्षा असेल. त्याच राज्यात आज काय चालू आहे? सरकारने 24 तासात निकाल देऊन आरोपी ला भर चौकात रॉकेल ओतून पेटवून द्यावे . त्या शिवाय बलात्कार बंद होणार नाहीत . तुम्ही सहमत असाल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. 

माझ्या कडून एक छोटीशी कविता                              

 हिमतीची वाघिण तू,

कुळाची स्वामिनी तू…


पतीची अर्धांगिनी तू,

लेकरांची माऊली तू.....


मायेने जेवण भरवणारी आजी तु, 

जेवणाची सुगरण तु.....


भावाची पाठराखीण बहीण तू,

मैत्री जपणारी मैत्रीण तू…


हट्ट पुरवणारी मावशी तु, 

अनाथाची आई तु.....


ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू,

स्वरांची सुरेल सरस्वती तू....


शिवबाची जिजाऊ तू,

विठ्ठलाची बहिणाबाई तू...


ताजमहालाची प्रेमळ निशाणी तू…

जगाची आदिशक्ती तू...


सळसळत्या मावळ्यांची जय भवानी तू,

राक्षसांना मारणारी काली माता तू...


खरचं सार्‍यांची मालकीण तू..

जोपर्यंत सुर्य, चंद्र ,

तोपर्यंत ना संपणार तुझे हे अस्तिव,

तुझवाचून हे विश्व आपूले,

नाही टिकणार…

   माझ्या मते आज स्त्री ही सुरक्षित आहे नाही . आज स्त्री सुरक्षित आहे का??? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा .

 वरील लेखात काही चुकले असेल तर तुमचा भाऊ समजून माफ करा. आणि चुक काय आहे हे नक्की कळवा, यामुळे नंतर चुक होणार नाही.