साबण तयार करणे व्यवसाय/ Soap Manufacturing Business Idea

 

 साबण तयार करणे व्यवसाय/ Soap Manufacturing Business Idea




      नमस्कार उद्योजक मित्रांनो, नेहमी प्रमाणे आज आपण पाहणार आहोत सोप मेकिंग व्यवसाय म्हणजेच साबण तयार करणे व्यवसाय,  साबण व्यवसाय/Soap Manufacturing Business Idea बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता लागते तसेच त्यासाठी भांडवल किती लागेल जी मार्केटिंग कशी करता येईल  अशी सर्व माहिती A to Z आपण बघणार आहे.  मग चला सुरूवात करुया.

     सध्याच्या काळात साबण ही आवश्यक वस्तूंपैकी एक वस्तू समजली जाते. अंघोळीपासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व काम ही साबणाशिवाय शक्य होत नाही. साबण ही अशी वस्तू आहे, जी प्रत्येक वयोगटातील व्यक्ती वापरतात. त्यामुळे साबणाची मागणी ही बाजारात कायम असते. याच संधीचे तुम्ही सोनं करु शकता.

     सध्याच्या Chemical च्या जमण्यात सर्वांना Natural प्रॉडक्ट्स ची ओढ असते. बऱ्याच स्किन प्रॉब्लेम्स असलेल्या लोकांना डॉक्टर कडून तसा सल्ला सुद्धा देण्यात येतो, म्हणून हा साबण बनवण्याचा बिझनेस करण्यात काहीच हरकत नाहीये.



     किती जागेची आवश्यकता?

        साबण बनवण्याचे युनिट बसवण्यासाठी तुम्हाला एकूण 800 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. यातील 500 चौरस फूट व्यापलेले हवे. तर उर्वरित भाग हा खुला असावा. यात सर्व प्रकारच्या मशीनसह विविध प्रकारचे उपकरणं बसवण्यात येतील.


    साबण बनवण्यासाठी लागणारी सामग्री-

      • सोप नूडल्स- ज्या कोकोनट तेल किंवा पाम तेलापासून बनवले जातात.
      • स्टोन पावडर- साबण वाढण्यासाठी पावडर ची गरज लागते.
      •  रंग- रंग आणण्यासाठी गरज लागते.
      •  परफ्युम- त्याच बरोबर साबणाला चा वास यावा  याची पण गरज लागते.



     साबण बनवण्यासाठी लागणारी सामग्री ची किंमत-

        सोप नूडल्स ची किंमत  रू 75 प्रति किलोग्राम. पूर्ण 50 किलोग्राम चे रॉ मटेरियल साठी  साबण बनवण्यासाठी  खर्च रू 3500 .

        परफ्यूम - याची किंमत तुम्ही कोणता परफ्यूम वापरता त्या वरती अवलंबून आहे.


    साबण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनस-

      • रॉमटेरियल मिक्सिंग मशीन
      • मिलर मशीन
      • सोप प्रिंटिंग मशीन

    अशा सर्व मशीन तुम्हाला 85-90 हजार रुपयांत मिळतील. तुम्ही लोकल दुकानातुन किंवा India Mart  वरुन घेऊ शकता.


     

    साबण बनवण्याची प्रक्रिया-

        साबण तयार करत असताना तुम्हाला सोप नूडल्स मिक्सिंग मशीन मध्ये टाकून त्याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला स्टोन पावडर टाकायची असते त्यानंतर 50 किलो नूडल्स मिक्स करताना अडीच किलोग्रॅम स्टोन पावडर टाकतात नंतर त्यात रंग आणि परफ्युम टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्टोन पावडर आणि सोप नूडल्स यांना व्यवस्थित मिक्स करायचे आहे त्यानंतर मिलर मशीन मध्ये हे दोन्ही मिक्सर व्यवस्थित करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला ते मिश्रण काढून टॉप प्रिंटिंग मशीन मध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने तुमचे साबण प्रिन्ट होऊन म्हणजेच साबण तयार होऊन येतात.

    साबण विक्रीसाठी पॅकेजिंग- 

        साबण विक्रीसाठी पॅकेजिंगची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पॅकेजिंग दरम्यान, साबण प्रिंटिंग मशीनच्या मदतीने कच्च्या मालापासून बनवलेल्या साबणाला त्याचे ब्रँड नाव दिले जाते. यानंतर, ते कागदापासून बनवलेल्या ब्रँड पॅकेजमध्ये पॅक करावे लागेल. तुम्ही तुमचा प्रोडक्ट वेगळा दिसण्यासाठी इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे  पॅकेजिंग करू शकता ,त्यानंतर शहरातील विविध दुकानांमध्ये  विकले जाते.

     साबण बनवण्याच्या व्यवसायासाठी व्यवसाय परवाना-

        या व्यवसायासाठी आवश्यक परवाना पालिकेच्या व्यवसाय विभागाकडून घेतला जातो. परवाना मिळाल्याने कंपनीच्या आयटी रिटर्न्स इत्यादींमध्ये खूप मदत होते. दीर्घकालीन व्यवसायासाठी किंवा मोठ्या व्यवसायासाठी परवाना असणे आवश्यक आहे.

     साबण बनवण्याच्या व्यवसायाचे मार्केटिंग-

        मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी शहरातील मोठ्या किराणा दुकानांशी बोलणे आवश्यक आहे. या दुकानांमध्ये साबणाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, कारण छोटी दुकाने या दुकानांतून साबण खरेदी करतात. आकर्षक पॅकेजेस आणि मर्यादित कालावधीच्या ऑफर तुम्हाला मार्केट पकडण्यात मदत करू शकतात.

         Blog  आवडला तर नक्की शेअर करा, आणि हो लाईक करायला विसरु नका. तुम्हाला कोणत्या बिझनेस बदल माहिती हवी असल्यास कमेंट नक्की करा.