गोष्ट एका मराठमोळ्या EV स्टार्टअप ची Revamp Moto Pvt.Ltd

                                 Revamp Moto Pvt.Ltd

गोष्ट एका मराठमोळ्या EV स्टार्टअप ची.

Revamp Moto Pvt.Ltd

        सध्या इलेक्‍ट्रिक व्‍हीकलचा (Electric vehicle) जमाना आहे. लोकांना पण हे वाहन केवळ दळण-वळणापुरते मर्यादित न ठेवता वापरकर्त्यांना त्‍यांच्‍या गरज व आवश्‍यकतेनुसार वेगवेगळ्या उपयोगात आणता येईल, असे वाहन विकसीत केले आहे. नाशिकचे स्‍टार्टअप (Startup) असलेल्‍या ‘रिवॅम्‍प मोटो’ (Revamp Moto) यांनी ही बहुउपयोगी ‘आरएम मित्रा’ (RM Mitra) आणि आर एम २५ दुचाकी साकारली आहे.जयेश टोपे, प्रितेश महाजन आणि पुष्कराज साळुंखे या तीन मित्रांनी यांच्‍या या स्‍टार्टअपला गुंतवणूकदारांचा, तर वाहनाला ग्राहकांचा आत्तापासून प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्‍हणजे सोनी वाहिनीवरील शार्क टँक या स्‍टार्टअपविषयक कार्यक्रमासाठी मध्ये त्याना अमन गुप्ता (Co-Founder of Boat)आणि अनुपम मितल (Founder of Shadi.com) यांच्या कडून 1 करोड (1 Cr for 1.50% equity )रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्‍तरावर झळकणार आहेत.


अपयशातून घेतली उंच भरारी जयेश, प्रितेश आणि पुष्कराज या तीन मित्रांनी सुरवातीला वैयक्‍तिक स्‍टार्टअप उभारलेले आहेत. जयेशने व्‍हेजिटोफार्म हे स्‍टार्टअप कोरोना काळात सुरु केले. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोचवितांना उलाढाल वीस ते पंचवीस लाखांपर्यंत नेली. परंतु, इलेक्‍ट्रीक व्‍हिकलविषयीच्या प्रेमापोटी तो पुन्‍हा आपल्‍या स्‍वप्‍नाकडे वळला. पुष्कराजनेदेखील इलेक्‍ट्रॉनिक्‍स सर्कीट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स सोल्‍यूशन्सशी निगडीत स्‍टार्टअप चालविले आहे. तर प्रितेशने एसबीआयमध्ये नोकरी करताना अर्धवेळ विविध संकल्‍पनांवर काम करण्यासाठी स्‍टार्टअप सुरु केले. आई वडील चा विरोध असताना देखील नोकरी सोडली . या तिघांनी आपल्‍या पहिल्‍या टप्‍यातील या अनुभव व चुकांतून शिकत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा केल्‍या. कुणी सोडली नोकरी, तर कुणी परदेश दौराअगदी शिक्षणासाठी युकेला जाण्याच्‍या तयारीत असलेल्‍या प्रितेशने ऐनवेळी निर्णय बदलत स्‍टार्टअपमध्ये सहभाग नोंदविला. स्‍टार्टअपला बळकटी देण्यासाठी चांगल्‍या टीमची आवश्‍यकता होती. अशात यापूर्वी महाविद्यालयीन स्‍तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या आपल्‍याच काही साथीदारांना विचारणा केली. अंतीम वर्षात असलेल्‍या या आठ जणांना तसे नामांकित कंपन्‍यांत चांगल्‍या पॅकेजच्‍या संधी उपलब्‍ध होत्या. परंतु, त्‍या धुडकावत रिवॅम्‍प मोटोची टीम अधिक बळकट झाली.


      दळणवळणासाठी इलेक्‍ट्रॉनिक वाहनाचा मर्यादित वापर न ठेवता समाजातील प्रत्‍येक घटकाला त्‍यांच्‍या गरजेनुसार वापरता येईल अशी वाहनाची रचना केलेली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूकीपासून तर एखाद्या छोट्या व्‍यावसायिकाला ‘शॉप ऑन टु व्‍हिल’, व्‍यवसायातील माल वाहतूक, दिव्‍यांगांना सुलभ प्रवासापासून तर तरुणाईला स्‍पोर्ट लूकचे वाहन असे बहुउपयोगी वापर या वाहनाचे आहेत. विशेष म्‍हणजे आपल्‍या गरजेनुसार या वाहनाची रचना घरच्‍या घरीच करता येते. कॉर्पोरेटलाही त्‍यांच्‍या उपयोगासाठी व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे विशेष सॉफ्टवेअर उपलब्‍ध करुन दिले जाते आहे.



या वाहनाला शासनाचे अनुदान जयेश, प्रितेश आणि पुष्कराज हे तिघेतही नाशिकचे भुमिपूत्र असून, त्‍यांनी मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. टीसीएसच्‍या (TCS) डिजिटल इम्‍पॅक्‍ट स्‍क्‍वेअरमधील मार्गदर्शक निखील देवरे यांच्‍यामुळे तिघे एकत्र आले. पहिल्‍याच भेटीत स्‍टार्टअप निर्मितीचा निर्धार तिघांनी केला. सप्‍टेंबर २०२० मध्ये ही भेट झाली होती. त्यानंतर अवघ्या वर्षभरात स्‍टार्टअपचा विस्‍तार करून तिघांनी मोठे यश मिळविले आहे. हाय स्‍पिड ‘आरएम मित्रा’च्‍या तंत्रज्ञानासाठी पेटंट, तसेच ट्रेडमार्कची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. शासनाचे अनुदान मिळत असल्‍याने हे वाहन ४५ ते ६० हजार रुपयांपर्यंत उपलब्‍ध होऊ शकते.


''आधीपासून इलेक्‍ट्रॉनिक व्‍हिकल निर्मितीची आवड होती. एकाच धेय्याने झपाटलेले आम्‍ही एकत्र आलो व आमची चांगली टीम तयार झाली. बहुउपयोगी अशी आरएम मित्रा ही प्रत्‍येक समाज घटकासाठी उपयुक्‍त ठरेल. आम्‍हाला गुंतवणूकदार तसेच, ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.'' क़पनी ला ५०हजार बाईक ची आर्डर मिळाली आहे.

तर असा होता त्याचा प्रवास. आता product बद्दल जरा बोलुयात.

Revamp Moto ने दोन बाईक बनवल्या आहेत एक 'आर एम २५ 'आणि 'आर एम मित्रा ' 



आर एम २५

Range-70 km

Top speed -25 kmph. 

 Load Capacity- 120 kg 

Price -45k to 55k. 



RM Mitra 

Range-140kms. 

Load Capacity-200 kgs. 

 Top Speed-65 kms. 

 Price -1.06 to 1.20 lakh

  आर एम मित्रा मध्ये Custom build an attachment - Panniers

Back Seat

Delivery Basket

Food Box

Modular Shop

Folding Table

Front Rack

Side rack 

fridge

 या सारख्या गोष्टी आहेत.

तुम्हाला कशी वाटली बाईक आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.