घरात अठराविश्व दारिद्य्र, आई-वडील मोलमजुरी करणारे...अशा परिस्थितीत काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीने व त्यासाठी घेतलेल्या कष्टांतून त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केले."माने ग्रुप ऑफ कंपनीज'च्या माध्यमातून जगभरात आपली ओळख निर्माण केली व थर्माकोलच्या उद्योगात नाव कमावले. असे हे toilet Man म्हणून ओळखले जाणारे रामदास माने.
रामदास माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील लोधवडे गावचे.येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला .. गावी केवळ कोरडवाहू शेती होती मान -खटाव हे दुष्काळी भाग.आई-वडिलांनी मोलमजुरी करून माने यांना दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. त्यांची आई त्यांना शाळेत सोडण्यासाठी दररोज 28-३० किलोमीटर पायी प्रवास करीत असे. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर माने यांनी आजीकडून 20 रुपये उसने घेत सातारा येथील आयटीआयमध्ये वायरमनच्या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. दिवसा शिक्षण, रात्री एसटी स्टॅंडवर मुक्काम करत तेथील एका हॉटेलमध्ये त्यांनी साडेतीन रुपयांच्या पगारावर वेटरचे काम केले. वायरमनच्या अभ्यासक्रमात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
त्यानंतर भोसरीतील महिद्रा , पिंपरीतील फिनोलेक्स कंपनीत मेंटेनन्स व्यवस्थापक म्हणून काम बघितले. के. के. नाग कंपनीतील व्यवस्थापकपदाचा राजीनामा दिल्यानंतर साठविलेल्या पाच लाखांमध्ये त्यांनी एमआयडीसीत जागा घेतली व "माने इलेक्ट्रीकल्स' ही पहिली कंपनी सुरू केली. माने यांना देश व राज्य पातळीवरील 125 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. दरम्यान, ग्रामस्वच्छता अभियानात लोधवडे गावाला 2007 मध्ये प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी 25 पैकी दोन स्वच्छतागृहे आवश्यक होती. तीन दिवसांमध्ये थर्माकोलवर सिमेंट कॉंक्रिट करून दोन स्वच्छतागृहे बनविण्याचे तंत्र माने यांनी विकसित केले
माने यांनी संयुक्त अरब अमिरातीतील मस्कत येथील राजासमध्ये जगातील सर्वांत मोठा थर्माकोल निर्मितीचा प्रकल्प उभा करून दिला व त्याची नोंद "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'नेही घेतली.भारतात आणि भारताबाहेर ८०% थरमाकाँल मशीन त्यांनी दिलेल्या आहेत. आज कंपनी च 30 cr टर्नओवर आहे .
संपूर्ण भारतात आणि जगभरातील 45 देशात माने थर्माकॉल बनवण्याचा प्लान्ट, मशीनरीसह थर्माकॉल निर्यात करतात. थर्माकॉलपासून रेडिमेड आरसीसी टॉयलेट बनवून देशातल्या 17 राज्यांमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर देत आहेत. आतापर्यंत त्यांनी 23 हजार टॉयलेट्स पुरवली आहेत. ३५२ प्रकल्प साठी मशिनरी निर्यात माने यांनी 25 नववधूंच्या विवाहात मोफत शौचालय देऊन एक सामाजिक संदेश दिला होता.
आजच्या या कोरोनाच्या काळात त्यांनी thermocol चे bed ही नवीन कल्पना साकार केली आहे त्यांनी पुण्यातील हॉस्पिटल ला बेड दिले आहेत. कोणतेही काम करत असताना लाजु नये प्रत्येक काम हे श्रेष्ठ आहे च.