जिवन म्हणजे काय?
एखादी घटना समोर आली कि त्या गोष्टी बदल प्रत्येकाच्या मनात विचार येतात आणि प्रश्न येतात तसेच काही मला जे आवडले ते मी थोडे थोडे लिहत . मला जास्त एकटे शांत बसण्यात जास्त आनंद मिळतो ते पण शांत वातावरणात . मनात विचार आला की जिवन म्हणजे काय ?? मनात आलेले विचार कागदा वर लिहू लागलो ..... ..........
माझा हा दुसरा ब्लाँग आहे तो जीवना वर आधारित
कधी स्वतः च्या मनाला विचार
जिवन म्हणजे काय????
कोण म्हणेल माझे प्रेम म्हणजे जिवन, काहीजण म्हणतील माझे मित्र, आई वडील. पण जिवन म्हणजे तरी काय? प्रत्येक जण आप आपल्या इच्छेनुसार जिवन म्हणजे काय ते सागत असतो.
*माझ्या मते जिवन म्हणजे श्वास घेतो आणि सोडतो यामध्ये जे अंतर आहे ते म्हणजे जिवन* काही ना कळले नसेल ,आपण जन्म घेतो तेव्हा प्रथम श्वास (Oxygen) घेतो आणि मरण पावतो तेव्हा सोडतो. यामधील अंतर ते जिवन.
*तुमच्या मते जिवन म्हणजे काय? Comment करा*
आजकाल युवा पिढीनुसार जिवन म्हणजे प्रेम आहे (Love is Life)
आजकाल ची मुले-मुली प्रेम हे पैसे पाहुन करतात. खिशात असेल मनी तर लागतील सतरा जणी मागे आज ज्यांच्या कडे पैसे आहेत ना त्याच्या मागे मुली फिरतात . वाईट अवस्थ झाली आहे या युवा पिढीची . तसा विचार केला तर काही मुली चांगल्या असतात. आणि हो मुलेपण.पण आज विचार केला तर ९०./. मुले मुली Timepass साठी प्रेम करतात. तर १०./.मुले मुली हे खरच मनापासून प्रेम करतात. ते त्या व्यक्ती साठी काही पण करु शकतात. आजकाल ९०./. मुला मुलीनी प्रेमाची व्याख्या च बदली आहे
आजची पिढी जिवन जगतच नाही. प्रत्येक व्यक्ती पैशांच्या पाठीमागे धावत आहे. कधी कधी मला प्रश्न पडतो की या मानवाने घड्याळ तयार केले आहे का घड्याळाने मानव ला तयार केले आहे. कारण आजचा मानव हा घड्याळाचा गुलाम आहे. हो गुलाम च! पैशाच्या पाठीमागे धावत धावत जिवन म्हणजे काय? ते विसरलाच आहे.
माणुसकी राहीली च नाही. आज कालचे लोक अपघात झाला तर मदत करत नाहीत तर आधी फोटो काढतात. आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे.
तरीपण आज या जगात वेळ महत्व ची आहे. वेळ हि कोणासाठी थांबत नाहीत मग तो कोणीही असे. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी वेळ असतो. मग ती गोष्ट संजीव किंवा निर्जीव असो. उदा. - कोणतीही व्यक्ती एखाद्या व्यक्ती साठी ठरावीक वेळ पर्यत वाट पाहु शकते मग ते प्रेम असो किंवा अन्य काही.आज युवा पिढी ही ९२./.नशेच्या आहारी गेलेली आहे. Smoking ,Drinking आणि इतर काही पदार्थचे व्यसन करतात. याला विरोध केला पाहिजे , याला जबाबदार कोण आहे ? प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल मी तर म्हणतो की याला जबाबदार त्याचे आईवडील आहेत .हो आई वडील च! कारण आईवडील मुलाना जेव्हा पैसे मागतील तेवढे देतात. त्यानी आपल्या मुलांना पैसे देतानाा चौकशी करावी .आईवडील नी मुलासोबत मित्रां सारखे वागावे. काहीणा . त्यांना आपल्या आईवडीला च्या कष्टाची जाणीव नसते .शहरात याचे प्रमाण अधिक आहे आणि खेडेगावात कमी आहे .
जीवन खूप खूप सुंदर आहे. जिवन हे freely जगले पाहिजे .जीवन हे एकदाच भेटते. जीवनात कोणतीही गोष्ट अवघड नाही. जीवनात प्रगती करत राहीची हार पत्करावी लागल्यानंतर ही पुन्हा नव्याने सुरूवात करायची. (Try try but don't Cry) अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जीवनात बरेच लोकं भेटतील कोणी साथ देईल तर कोणी सोडून जाईल. लोकांच्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. जीवन हासत आणि मजेत जगायचं.
जीवन जगताना बरेच लोक भटतात. जीवनात कोणतीही गोष्ट अवघड नाही., जी गोष्ट अवघड आहे ती या जगात नाहीच. बरेच लोक जीवन जगायचे म्हणून जगत असतात. अशा लोक फक्त स्वत: ता चा विचार करत असतात. काही लोक असतात, ते स्वतः चा आणि सर्व चा विचार करत असतात असे लोक आज या जगात कमी आहेत.
मी Train ची वाट पाहत रेल्वे स्थानकावर बसलो होतो. दोन कुत्रे तेथे होती पण त्यातील एक कुत्र्याचा पुढचा उजवा पाय नव्हता तरी तो दुसर्या कुत्रा बरोबर मस्ती करत होता. इकडून तिकडून धावत होता. किती तरी तो आनंदीत होता. त्याच्या कडे बघून वाटले मानवाला देवाने चांगली बुध्दी, शरीर दिले आहे तरीपण माणुस जीवनात रडत असतो.
आपल्या देशात असे बरेच लोक आहेत ज्यानी आपल्या जीवनाची सुरुवात शून्यातून केली. उदा. 1)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवनाची सुरुवात ही चहा विकत केली.
2)डाँ.पतंगराव कदम हे सांगली जिल्ह्यातील सोनसळ गावचे. घरची परिस्थिती गरीबीची होती, तरी ते शिकले. त्यानी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी भारती विद्यापीठ शिक्षण संस्थेची स्थापना केली.त्यानचे एकच ध्येय होते की खेडेगावातील मुलांना चांगली ठिकाणी शिक्षण भेटावे. त्यांनी ते करुन दाखवले.
अशी बरीच उदाहरणे देता येतील, डी . एस. कुलकर्णी , बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, डॉ.ए.पी.जी .अब्दुल कलाम.
आजचा माणुस हा स्वतः ह पुढे जात नाही आणि दुसऱ्या ला पण पुढे जात नाही. एकादी व्यक्ती पुढे जात असेल ,तर त्या व्यक्तीचे पाय ओढणे. असेच काही नमुने असतात . स्वतःचे च शाहने करणे, स्वत तर काही येत नाही पण दुसऱ्या ला त्रास देणे,.
अश्या लोकामध्ये मराठी माणुस जास्त आहेत. त्यामुळे मराठी माणूसाच्या प्रगती होत नाही. मराठी माणूस आज खूप पाठीमागे आहे. मराठी माणसाला राग आला असेल आणि आला पाहिजे.मी पण मराठीच आहे.
एक वेळ अशी यईल मराठी माणूस या देशावर राज्य करेल. त्यासाठी मराठी माणूस ने एकजीव झाले पाहिजे, प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले पाहिजे ,कोणत्याही कामात कमीपणा न करता काम केले पाहिजे .
मित्रांनो जीवन हे फार किंमती आहे. प्रत्येक व्यक्ती कडे काहीतरी वेगळं असतं ते ओळखा आणि त्यावर काम करत रहा, एके दिवशी तुम्ही मोठे व्हायला . जीवनात बरीच अडचणी येतात तेव्हा खचुन जाऊ नका. आयुष्यात अडचणी आल्या म्हणून आत्महत्या करू नका. जीवनात काही झाले तरी हार मानायची नाही.
आयुष्यात माणसाला मागितलेलं सगळंच मिळतं का?
जगातला बहुतेक एकही माणूस या प्रश्नाचं उत्तर 'हो' असं देणार नाही.आणि
दिलंच जर हो असे उत्तर, तर मग मनातल्या मनात तो स्वतःलाच हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत बसेल की,
खरंच आयुष्यात माणसाला मागितलेलं सगळंच मिळतं का?
अजिबात काहीच मिळालं नाही असं म्हणता येत नाही. मागितलेलं मिळतंही.
पण कधी वेळ चुकलेली असते तर कधी मागितलेलंच चुकलेलं असतं.
आयुष्यात कितीही समाधानी झालो, तरी समाधानाच्या शेवटच्या एका टोकाला कुठेतरी एक अपुरी इच्छा जिवंत असते.ती ज्याची त्यालाच माहित असते. ज्याची त्यालाच लक्षात राहते.
'वाटणं' आणि 'असणं' यातला फरक म्हणजे आयुष्य.
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत, पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
काही वर्षा पूर्वी- सायकल
आज- Bike
काही वर्षा पूर्वी - शाळेचे दप्तर
आज - एक वही आणि पेन
काही वर्षा पूर्वी - काळी पाटी आणि पेन्सिल
आज - Note book.
काही वर्षा पूर्वी - शाळेत राष्ट्रगीत, प्रतिक्षा, पसायदान, श्लोक
आज - mobile vr love Song, Games
काही वर्षा पूर्वी - Half pants.
आज - पाटकी कपडे घालून येतात आणि वरुन म्हणतात फॅशन आहे फँशन
काही वर्षा पूर्वी - प्लास्टीकचे खेळणे रिमोटवाली कार
आज - आता फक्त मोबाईल
काही वर्षा पूर्वी - परिक्षा आणि शिक्षकांची भिती
आज - आता शिक्षकांना नाच भिती
काही वर्षा पूर्वी - आईच्या हातचे जेवण.
आज- मेसचे जेवण
काही वर्षा पूर्वी - परिक्षा फी फक्त 5रुपये.
आज - 2500 रुपये .
काही वर्षा पूर्वी- शाळेतला स्नेह संमेलन
आज - डान्स बार
काही वर्षा पूर्वी - शाळेतील सहल
आज - Industry visit
काही वर्षा पूर्वी - स्वतंत्र दिनादिवशी फिरु मारणे
आज - आता राजकीय पक्षात प्रचरासाठी फेरी मारणे.
काही वर्षा पूर्वी - दिवाळीच्या फटाक्यांची वाट बघणे
आज - दिवाळी कधी आली आणि गेली हे कळत नाही.
काही वर्षा पूर्वी - मोठी स्वप्ने बघणे.
आज - स्वप्न पाहणेच विसरलो.
काही वर्षा पूर्वी - latest cartoon show पहायचो.
आज - Web series, moive
काही वर्षा पूर्वी - सोबतीला जीवलग मित्र असल्याचे असायचे.
आज - आता भेट सुध्दा होत नाही.
थोड्याफार फरकाने सगळे तर तसेचं आहे
यार मग नक्की काय बदलले आहे ???
ती मजा कुठे गेली ??? गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी . काय ते बालपण मज्जेत होते. आईचा मार खाणे, शाळेत शिक्षिका चा मार खाणे, मित्रांसोबत बरच वेळ गप्पा मारत बसणे, मित्रां सोबत फिरणे. अशा हे बालपण रम्य होते.
मित्रांनो अजून तरी जिवन खुप आहे. आपल्या जीवनात काय करायचे ही आपल्या वर आहे. कोणतीही गोष्ट असूद्या त्यात यश भेटल्या शिवाय प्रयत्न करणे सोडायचे नाही कोणत्याही अडचणी आल्या तरी.
😞😠जी व्यक्ती मनाने चांगली, कोणतेही वाईट सवय, व्यसन नसते.अशा व्यक्ती ची किंमत लोक कधीच समजु शकणार नाहीत. 😠😞 तरी पण हार मानयची नाही मित्रानो.
या जन्मावर या जीवनवर खुप प्रेम करावे… हो जीवनावरच म्हटलय मी… कारण जीवन हे खुप सुंदर आहे अणि महत्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी अणि तुमच्या प्रियाजनासठी… जीवनावर काही विशेष विचार या लेखात तुमच्यासाठी....
जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.
जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती व्यस्त दाखलवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.
जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…
ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
जीवनात दोनच मित्र कमवा….
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल.
आणि
दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रेम हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.
“जीवनात” ♥️👫प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.❗️♥️♥️
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.
आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.
आयुष्यात तीन संघर्ष असतात.
1. जगण्यासाठीचा संघर्ष
2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष
जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.
जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.
आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा… तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी.
जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!
जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो
जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.😊
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय.
जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.
मित्रांनो जीवनावर आपण कितीही लिहल तरी कमीच… त्यात जार जीवनावर आधारित सुविचार लिहायचे म्हटल्यावर विषयच वेगळा… असो, तुम्हाला जर हे जीवनावरचे विचार आवडले असतील तर जरूर comment करून कळवा. आणि तुमच्या जवळ जीवनावर आणखी विचार असतील जे कि मनाला भिडून जातील. तुमच्या मते जीवन म्हणजे काय ?आणि आताच्या मानवाने कसे जगावे . ते पण comment मध्ये लिहून टाका.
आणि हो मी माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. कोणाचे मन दुखावले असेल तर माफी असावी. धन्यवाद
Vishal Sawant